
श्रद्धा ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने दाढमध्ये सामाजिक योगदानाचा संदेश
झरेकाठी (प्रतिनिधी):- समाजाचे आपण काही देणे लागतो, या सेवाभावी भावनेतून तसेच दुष्काळी परिस्थितीत समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, या जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत श्रद्धा ग्रामविकास प्रतिष्ठान, दाढ बुद्रुक यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. श्रद्धा ग्रामविकास प्रतिष्ठानचे मार्गदर्शक तथा प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अशोकराव गाडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त महात्मा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी मल्टीपर्पज मॅट भेट देण्यात आल्या. मागील वर्षी १५ आणि यावर्षी ११ अशा एकूण २६ मॅट विद्यार्थ्यांना देण्यात



















































